Delhi Blast : 'ती कार आमची नाही', Pulwama तील Amir-Umar च्या कुटुंबीयांचा दावा, तिघे ताब्यात
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोट प्रकरणात (Delhi Blast) जम्मू-काश्मीरमधून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुलवामा (Pulwama) येथील अमीर रशीद (Aamir Rashid), उमर रशीद (Umar Rashid) आणि तारिक अहमद मलिक (Tariq Ahmed Malik) यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, अमीर आणि उमरच्या कुटुंबीयांनी या घटनेत वापरलेली कार आमची नसल्याचा दावा केला आहे. 'घटनेतील कार ही आमची नाही, आमची कार घरात अजूनही उभी आहे', असा दावा उमरच्या कुटुंबीयांनी केला आहे. आमची मुले कधीही दिल्लीला गेली नाहीत आणि हरियाणा पासिंगची कार आमच्याकडे नाही, असेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले. उमर पुलवामामध्ये प्लंबरचे काम करतो, असेही त्यांनी सांगितले. या दाव्यांमुळे दिल्ली पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या तपासातील गुंतागुंत वाढली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement