Sambhajingar Alert : दिल्ली स्फोटानंतर संभाजीनगरमध्ये धाकधूक, रेल्वे स्टेशनवर कडेकोट बंदोबस्त

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर (Delhi Blast) देशभरात हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) देखील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शहरातील रेल्वे स्टेशनवर (Railway Station) पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून, प्रत्येक प्रवाशाची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जात आहे. रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर बॅग स्कॅनर लावण्यात आले असून, जीआरपी (GRP), आरपीएफ (RPF) आणि स्थानिक पोलिसांची (Local Police) पथके २४ तास गस्त घालत आहेत. यावर बोलताना एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, 'अभी इधर पूरा ट्वेंटी फोर अवर्स वॉच कर रहा है मेन एंट्रन्स में... फ्लॅटफॉर्म ड्यूटी भी जीआरपी, आरपीएफ, लोकल पोलिस पूरा राउंड मार रहा है'. साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले असून, कोणत्याही संशयित हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola