Deleted Voters | मतदार यादीतून वगळलेल्यांची स्वतंत्र यादी देण्यास Election Commission चा नकार, SC मध्ये खटला

निवडणूक आयोगानं मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी देण्यास नकार दिला आहे. बिहारमधल्या मतदार याद्यांचा आयोगानं आढावा घेतला आहे. यासंबंधी सुप्रीम कोर्टात खटला देखील सुरू आहे. या खटल्यादरम्यान आपली भूमिका मांडताना आयोगानं म्हटलं आहे की, "वगळलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी देण्याचं आमच्यावर नियमाचं बंधन नाही." असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं यासंबंधी याचिका दाखल केली आहे. त्यांनीच अशा वगळलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी दिली जावी अशी मागणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे मतदार यादीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola