Delhi Blast: 'कटकारस्थान रचणाऱ्यांना सोडणार नाही', संरक्षण मंत्री Rajnath Singh यांचा इशारा
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्यामागे असलेल्यांना कठोर इशारा देताना त्यांनी तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचे सांगितले. 'मी देशाला खात्री देतो की या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांना न्याय दिला जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना सोडले जाणार नाही,' असे राजनाथ सिंह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. या घटनेनंतर दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement