कुणकेश्वरमध्ये दीपोत्सव, संत तुकाराम महाराज मंदिरातही दीपोत्सव,अंबाजोगाईजवळ 11000 पणत्या प्रज्ज्वलित
Diwali Padwa balipratipada 2021 : दिवाळीची सुरुवात झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. पौराणिक महत्त्व असलेल्या आणि कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवाळी पाडव्याचा सण शेतकरी राजा मोठ्या उत्साहाने साजरा करतो. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.