Deepak Kesarkar : फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या निवडीवर आक्षेप, दीपक केसरकर म्हणतात...
२०२१ या वर्षासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाग्मय पुरस्काराअंतर्गत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार "फ्रॅक्चर्ड फ्रीडम-तुरुंगातील आठवणी व चिंतन" या पुस्तकाला देण्यात आलाय. मात्र या पुस्तकाच्या निवडीवरून आता राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत... मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिलेय. या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केली नसल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलंय.