Pune : दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा, कलाकारांच्या प्रतिक्रिया

Continues below advertisement

पुणे : अस्तु, दहावी फ, नितळ, संहिता, दोघी, वेलकम होम, एक कप च्या असे अत्यंत तरल आणि पठडीबाहेरचे विषय अत्यंत सोप्या, सहज पद्धतीने चित्रपटात मांडणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन झालं. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात त्यांनी सोमवारी (19 एप्रिल) सकाळी सव्वासात वाजता अखेरचा श्वास घेतला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram