DCM Ajit Pawar Oath : आधी पहाटेचा आता दुपारचा शपथविधी, राज्यात पुन्हा एकदा राजकीय महाभूकंप

Continues below advertisement

राज्यात पुन्हा एकदा राजकीय महाभूकंप झालाय. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन हा महाभूकंप घडवला. एवढंच नाही तर अजित पवारांसोबत ८ आमदारांचाही शपथविधी झाला. रविवार दुपारच्या या राजकीय घडामोडीने केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकारण ढवळून निघालंय. या घटनेमुळे वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्याची जी राजकीय स्थिती होती तेच चित्र आज पुन्हा पाहायला मिळालं. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ते सरकार केवळ अडीच दिवस टिकलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी ३० डिसेंबर २०१९ रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज २ जुलै रोजी अजित पवार एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा उपमुख्यमंत्री बनलेत. अजित पवारांच्या सोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ आदींनी शपथ घेतल्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. त्याचवेळी महाराष्ट्रातील राजकारण किती अस्थिर बनलंय, हेही स्पष्ट झालंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram