Dawood Property Auction: दाऊदची जमीन घेण्यास कुणीच नाही; लिलाव अयशस्वी
Continues below advertisement
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव अयशस्वी ठरला आहे. या मालमत्तेमध्ये दाऊदची आई अमिना बी यांच्या नावे असलेली आणि सध्या त्याची बहीण हसीना पारकरच्या नावावर हस्तांतरित झालेल्या शेतजमिनीचा समावेश होता. 'सरकारकडून शेतजमिनीचा लिलाव करण्यात आला पण एकाचीही बोली लागलेली नाहीये'. विशेष म्हणजे, राखीव किंमत ३० टक्क्यांनी कमी करूनही एकाही व्यक्तीने बोली लावण्यात रस दाखवला नाही. खेड तालुक्यातील मुमके गावात असलेल्या या चार शेतजमिनीच्या प्लॉटची एकूण किंमत वीस लाख रुपये ठेवण्यात आली होती. गेल्या दहा वर्षांत दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावाला प्रतिसाद न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामुळे त्याच्या नावाचा दबदबा कमी झाला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ही मालमत्ता स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स कायद्याअंतर्गत (SAFEMA) जप्त करण्यात आली होती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement