Dawood's Assets: 'डॉन' दाऊदच्या रत्नागिरीतील वडिलोपार्जित जमिनीचा पुन्हा लिलाव, ४ नोव्हेंबरला बोली

Continues below advertisement
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) रत्नागिरीतील (Ratnagiri) मालमत्तांचा पुन्हा एकदा लिलाव होणार आहे. 'स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स कायद्याअंतर्गत' (SAFEMA) जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तांचा लिलाव ४ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मालमत्तांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुमके गावातील १०,४२० चौरस मीटर आणि इतर भूखंडांचा समावेश आहे. याआधी जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या लिलावात दाऊदची आई अमिना बी हिच्या नावावर असलेल्या दोन मालमत्ता विकण्यात आल्या होत्या, मात्र इतर दोन मालमत्तांसाठी कोणीही बोली लावली नव्हती. आता त्याच न विकलेल्या मालमत्तांचा पुन्हा लिलाव केला जात आहे. या लिलावासाठी सरकारने कठोर पावले उचलली असून, यातून मोठा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola