Darshana Pawar Crime : अपघात नाही खून...दर्शना पवार प्रकरणी मोठा खुलासा; शरिरावर आढळल्या जखमा
राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला होता. तिची हत्या झाल्याची धक्कादायक बाब पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आली आहे. तिच्या डोक्यावर आणि संपूर्ण शरिरावर मारहाणीच्या जखमा आढळल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी पाच पथकं तयार केली आहेत.