Sangli Uttam Mohite : सांगलीत वाढदिवशीच उत्तम मोहितेंची हत्या, थरारक CCTV फुटेज समोर
Continues below advertisement
सांगलीमध्ये दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवशीच निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोर केक घेऊन आल्यानंतर झालेल्या वादात चाकू, धारदार हत्यार आणि रॉडने हल्ला करण्यात आला, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या हल्ल्यात मुख्य आरोपी शाहरुख शेख याचाही जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गणेश मोरे यांच्यासह आठ आरोपींची नावे निष्पन्न केली आहेत. 'या प्रकरणाची आता सखोल चौकशी केली जाईल आणि कुठल्याही दोषींना सोडलं जाणार नाही,' अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. उत्तम मोहिते हे दलित हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते होते आणि त्यांनी नुकतेच बेकायदेशीर गोदामांविरोधात आंदोलन केले होते. आगामी महापालिका निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती, असेही समोर आले आहे. जुन्या भांडणातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement