Mira Road Accident: मीरा रोडमध्ये भीषण अपघात, चिमुकलीचा जागीच मृत्यू

Continues below advertisement
मुंबईतील दहिसर आणि मीरा रोडमधून दोन मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. दहिसरमध्ये खंडणी वसूल करून व्यापाऱ्यांना त्रस्त करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे, मीरा रोडमधील गोल्ड नेक्स्ट सर्कलजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. दुचाकी घसरल्याने खाली पडलेली दोन वर्षांची चिमुकली बाजूने जाणाऱ्या बेस्ट बसच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दहिसरमधील कारवाईनंतर स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. अनेक महिन्यांपासून ही टोळी या परिसरात सक्रिय होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola