Dahi Handi News : राज्यभरातील गोविंदांसाठी मोठी बातमी, विम्यासाठी 18 लाख 75 हजारांची रक्कम मंजूर
Continues below advertisement
यंदा महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा केला जाणारेय. त्याआधीच महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. गोविंदांच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजारांची रक्कम मंजूर करण्यात आलीय. हे विम्याचं कवच 8 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे.राज्य सरकारनं शासकीय आदेश जारी करून गोविंदांना शासकीय विमा कवच दिलं आहे. याआधी 50 हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याचे ठरवले होते. त्यात आणखी 25 हजार गोविंदांचा समावेश करून, राज्य सरकारनं 75 हजार गोविंदांना शासकीय विमा कवच दिलं आहे.
Continues below advertisement