Dahi Handi | जय जवान पथकाची विक्रमी कामगिरी, थर लावत रचला इतिहास!

जय जवान पथकाने आज दिवसभरात तिसऱ्यांदा दहा थर लावले आहेत. यापूर्वी त्यांनी दिवसभरात दोनदा दहा थर यशस्वीरित्या लावले होते. गोविंदा पथके ठिकठिकाणी जाऊन आपले कौशल्य आणि कसब सादर करत होती. जय जवान पथकाने देखील ठिकठिकाणी जाऊन आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले आहे. दहा थर लावण्याचा त्यांचा हा तिसरा प्रयत्न यशस्वी झाला. ही त्यांची आजच्या दिवसातील 'हॅट-ट्रिक' म्हणावी लागेल. जय जवान ने एक आगळावेगळा पराक्रम यावेळी करून दाखवला आहे. दिवसात तीन वेळा दहा थर लावून त्यांनी विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. दिवसात तीन वेळा दहा थर लावण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola