Dadar Shivaji park Dust : शिवाजी पार्कवर धुळ; काम नाही तर मतदान नाही, नागरिक आक्रमक

Dadar Shivaji park Dust : शिवाजी पार्कवर धुळ;  काम नाही तर मतदान नाही, नागरिक आक्रमक केवळ आश्‍वासनांवर  निवडून येणाऱ्या उमेदवारांना मुंबईतील दादरवासियांनी चांगलाच दणका दिलेला आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामधील धुळीमुळे गेल्या काही वर्षांपासून स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या धुळीच्या समस्या संदर्भात वारंवार आवाज उठवूनही कोणी याला दात देत नाही असे रहिवाशांचे म्हणणे आहे. निवडणुका आल्या की, तीच ती खोटी आश्‍वासने देणाऱ्या सर्वच "राजकीय पक्षांच्या उमेदवारांना शिवाजी पार्क वासीयांनी "काम नाही, तर मतदान नाही'', असे बजावत लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. मतदारांच्या या आक्रमक पावित्र्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारांना चांगलाच फटका मिळण्याची शक्यता आहे.या संदर्भात दादर शिवाजी पार्क रहिवाशांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola