DADAR : दादरच्या भाजी बाजारात पहाटे तोबा गर्दी,नागरिकांना हटकण्यासाठी पोलीसही अनुपस्थित : ABP Majha
इकडे मुंबईत नव्यानं सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढायला लागलीय. राज्य सरकारनं ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यूही जारी केलाय मात्र तरीही बाजारपेठांमधली गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये. दादरच्या भाजी बाजारात पहाटे साडेपाच वाजताच तोबा गर्दी दिसून आली. आश्चर्याची बाब म्हणजे काल मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू असूनही इथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी, बेशिस्त नागरिकांना हटकण्यासाठी पोलीसही अनुपस्थित होते. अशा गर्दीत ओमायक्रॉन संसर्ग बळावला तर राज्यावरील निर्बंध अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीच शिस्त टाळण्याची गरज आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Mumbai Police Marathi News ABP Maza Top Marathi News Dadar ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News