Puntamba Stike : कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतली पुणतांब्यातील आंदोलकांची भेट
Puntamba Stike : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात सुरु असलेल्या आंदोलनाची सरकारने दखल घेतलीय. कृषीमंत्री दादा भुसे आज पुणतांब्यातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत. बंद दाराआड कृषी मंत्र्यांची शेतकरी नेत्यांशी चर्चा सुरु आहे. किसान क्रांती संघटनेचे नेते तसंच कोअर कमिटी सदस्यांशी चर्चा सुरु आहे. प्रसारमाध्यमांसमोर चर्चा करण्यासाठी कृषी मंत्री तयार होते. मात्र कोअर कमिटीने यासाठी नकार दिला. आता शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बंद दाराआड चर्चा सुरु आहे. त्यामुळे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का याकडं लक्ष लागलंय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv