Aatmanirbhar Bharat: 'शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नजर', Rajnath Singh यांच्या अध्यक्षतेखाली ७९,००० कोटींच्या संरक्षण खरेदीस मंजुरी
Continues below advertisement
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) भारतीय सशस्त्र दलांसाठी सुमारे ७९,००० कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, 'या खरेदीमुळे शत्रूच्या लढाऊ वाहनांना, बंकर आणि इतर तटबंदीला निष्प्रभ करण्याची भारतीय लष्कराची क्षमता वाढेल.' या निर्णयामुळे 'आत्मनिर्भर भारत' (Aatmanirbhar Bharat) धोरणाला मोठी चालना मिळणार असून, लष्कर, नौदल आणि हवाई दलाची ताकद अधिक वाढणार आहे. लष्करासाठी यामध्ये नाग मिसाइल सिस्टीम (Nag Missile System), मोबाईल इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टीम आणि हाय मोबिलिटी व्हेइकल्सचा समावेश आहे. नौदलासाठी लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक्स (LPDs), नेव्हल सरफेस गन, ॲडव्हान्स्ड लाइटवेट टॉर्पेडो आणि स्मार्ट अमुनिशन खरेदी केले जाणार आहेत. तर, हवाई दलासाठी लांब पल्ल्याच्या लक्ष्यांवर मारा करणारे कोलॅबोरेटिव्ह सिस्टीम (CLRTS/DS) घेण्यात येणार आहे, जे मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वायत्तपणे उड्डाण, लँडिंग, नेव्हिगेट आणि लक्ष्याचा भेद करण्यास सक्षम आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement