Cyclone Tauktae : मुंबई,ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार

Continues below advertisement

मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाशी दोन हात केल्यावर आता तोक्ते वादळाचा (Cyclone Tauktae) सामना करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरु झाली आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. तर काही परिसरात सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. 

तर दुसरीकडे अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (14 मे) ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसंच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या. 

तोक्ते चक्रीवादळाचा प्रभवा विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहाव आणि मनुष्यबळ तसंच साधनसामुग्री तयार ठेवावी असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. 

दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ 18 मे पर्यंत गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram