Cyclone Mocha : 9 मे दरम्यान बंगालच्या उपसागरातून मोचा चक्रीवादळ सक्रिय : ABP Majha
Continues below advertisement
आजपासून ९ मे दरम्यान बंगालच्या उपसागरातून मोचा चक्रीवादळ सक्रिय होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलीय. यामुळे केवळ देशाच्या पूर्व भागातच पाऊस पडणार नाही; तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातही हवामानात बदल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तिवण्यात आलाय. त्यामुळे मच्छीमारांना पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता आहे. केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
Continues below advertisement