Cyclist यामिनी खैरनार यांच्याशी गैरवर्तन, तक्रारीनंतर संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
नाशिकमधील राष्ट्रीय सायकलपटू यामिनी खैरनार यांच्याशी गैरवर्तन करणं कर्नाटक पोलिसांना चांगलंच महागात पडलंय. यामिनी यांच्या तक्रारीवरून आता पोलिसांविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आलाय.. ३१ जानेवारीला यामिनी आपल्या खासगी वाहनानं गाणगापूरकडे जात होत्या, रात्री साडेअकराच्या सुमारास कर्नाटकातल्या बालुर्गी चेकनाक्यावर दारूच्या नशेत असलेल्या ३ जणांनी त्यांची गाडी अडवली आणि RTPCR रिपोर्टची मागणी केली.
Continues below advertisement