Cyber Attack : देशातल्या अनेक सरकारी वेबसाईटवर सायबर हल्ला, नुपूर शर्मा यांचं वक्तव्याचे पडसाद
Cyber Attack : देशातल्या अनेक सरकारी वेबसाईटवर सायबर हल्ला झाला. ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह सत्तर वेबसाईट हॅक करण्यात आल्या. मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचं आवाहन केलं. नुपूर शर्मा यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच संदेश या वेबसाईटवरून देण्यात आला. पहाटे ४ पासून हॅक करण्यात आलेली ठाणे पोलिसांची वेबसाईट दुपारी बाराच्या सुमारास पूर्ववत करण्यात यश आलं. हॅकर्सकडून डेटा पुन्हा मिळवण्यात यश आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv