Mobile Number while Shopping : ग्राहकांवर शॉपिंगदरम्यान मोबाईल क्रमांक देण्याची सक्ती नाही
Continues below advertisement
अनेकदा शॉपिंग केल्यावर दुकानदार आपला मोबाईल नंबर मागतात. सामानांच बिल मोबाईलवर येईल, नाहीतर बिल देऊ शकत नाही, असं कारण ते सांगतात. मात्र यावर आता केंद्र सरकारनं महत्त्वाचा खुलासा केला आहे. मोबाईल नंबर देण्याची सक्ती ग्राहकांवर केली जाऊ शकत नाही, तसं केल्यास ते ग्राहक हक्क नियमावलीचा भंग समजलं जाईल, आणि संबंधित दुकानदार किंवा आस्थापनावर कारवाईही केली जाऊ शकते, असं केंद्रीय ग्राहक खात्यानं स्पष्ट केलंय.
Continues below advertisement