Somnath Suryvanshi Case | सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी
बार्नेट येथे झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत अनेकांना पोलीस कोठडीत टाकले होते. यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील समावेश होता. पोलीस कोठडीतच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यास विरोधात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आव्हान दिले आहे. या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.