Wine in Local Shops : सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या 70 लाख बॉटल्सची विक्री ABP MAJHA

Continues below advertisement

थर्टी फर्स्ट जवळ आलाय.. आणि आता किराणा दुकान किंवा बेकरीमध्ये वाईनची बॉटल विक्रीसाठी दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.. कारण राज्य सरकारनं किराणा दुकान, डिपार्टमेंटल स्टोर, बेकरीमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र या दुकानातून वाईन विकत घेताना काहीसा खिसा देखील जास्त रिकामा करावा लागू शकतो. कारण एक लिटर वाईनमागे १० रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या निर्णयामुळं राज्य सरराच्या तिजोरीत जास्त नव्हे तर पाच कोटींची भर पडणार आहे..मात्र वाईनची किती विक्री होते याची नोंद सरकारला ठेवता येणार आहे.. सध्या राज्यात दरवर्षी  वाईनच्या ७० लाख बॉटल्सची विक्री होते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा १ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram