Ekvira Temple: एकविरा गडावर जमावबंदीचे आदेश, गडावर कोणते निर्बंध? ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Apr 2022 07:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगरी आणि कोळी समाजाचं कुलदैवत असलेल्या पुण्यातल्या एकवीरा देवीच्या गडावर जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू करत एक आदेश काढला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली असली तरी भाविकांना बंदी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. पण भांडण-तंटे आणि वाद टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात वेगवेगळे निर्बंध घालण्यात आले असून पशू-पक्षांचे बळी देण्यासही मनाई करण्यात आलीय.