Raosaheb Danve on CSMT: सीएसएमटी स्थानकाचं लवकरच कायापालट होणार, रावसाहेब दानवेंची माहिती

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे.  नव्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाला सुरुवात होणार आहे. येथील प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा करण्यात येणार आहेत. त्याचे प्रत्यक्ष काम जानेवारी महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलीय.  त्यासाठी 2 हजार 400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र पुनर्विकास करत असताना हेरिटेज इमारतीला धक्का लागू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, सीएसएमटीबरोबरच देशातील 1 हजार 250 रेल्वे स्थानकांचाही टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram