Oxygen Cylinder | नंदुरबारमध्ये ऑक्सिजन सिलेंडरसाठी झुंबड, सिलेंडर घेऊन नागरिक रुग्णाकडे
एखाद्या वस्तूची टंचाई निर्माण झाली का ती मिळवण्यासाठी जशी झुंबड उडते तशीच झुंबड नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचा कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची उडाली आहे. त्यामागील कारणही तसचं आहे. दोन दिवसापासून सुरु असलेल्या ऑक्सिजन टंचाईच्या बातमीमुळे हा प्रकार घडला असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.