Nagpur Fake Call Case : मुलानं दुष्कृत्य केलं सांगत कॉलवर पैसे लाटणारी टोळी, पोलिसांकडून तपास सुरु

Continues below advertisement

Nagpur Fake Call Case : मुलानं दुष्कृत्य केलं सांगत कॉलवर पैसे लाटणारी टोळी, पोलिसांकडून तपास सुरु

सायबर गुन्हेगारांनी नवीन युक्ती शोधत तरुण आणि किशोरवयीन मुलांच्या पालकांना फोन करून तुमचा मुलगा बलात्काराच्या प्रकरणात अडकला आहे... त्याने मित्रांसह मिळून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केले आहे.. आम्ही पोलीस असून तुमच्या मुलाला त्याच्या मित्रांसह अटक केली आहे.. तुमच्या मुलाला या प्रकरणातून सोडवायचे असल्यास दहा लाख रुपये द्यावे लागेल.. त्यासाठी बोलणी सुरू करण्यासाठी किमान 40 ते 50 हजार रुपये ऑनलाईन पाठवा असे फोन करणे सुरू केले आहे.. *नागपूरात अनेक पालकांना असे फोन येत आहे.. धक्कादायक बाब म्हणजे या सायबर गुन्हेगारांना फोन केलेल्या पालकाच्या मुलाचे नाव काय, वय काय, तो कुठे असतो याची इत्यंभूत माहिती असते... त्यामुळे अनेक पालक घाबरून या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून त्यांच्याशी पैशाची बोलणी करतात.. तर काहींनी पोलिसांकडे तक्रार देत आहे.. अशाच एका जागरूक पालकाने एबीपी माझाशी बोलून इतर पालकांची त्यात फसवणूक होऊ नये म्हणून स्वतः सोबत घडलेला सर्व प्रसंग सांगितला आहे.. जाणून घेऊ या फसवणुकीची ही नवी पद्धत काय आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram