Zero Hour Sarita Kaushik : महाराष्ट्रात 'बाहुबली राजकारण' वाढले, निलेश घायवळ प्रकरण गंभीर
Continues below advertisement
पूर्वी उत्तरेकडील राज्यांमध्ये बंदुकीच्या धाकावर राजकीय पोळी भाजली जात असे. आता महाराष्ट्रातही हे बाहुबली राजकारण पाळेमुळे घट्ट करत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडप्रवृत्तीचा वापर राजकारणासाठी खांब म्हणून होत होता, पण आता नेते गुंडांच्या भरवशावर अख्खा तंबूच उभारू लागले आहेत. Nilesh Ghayawal ची केस गंभीर आहे. या प्रकरणात गृहराज्यमंत्री, मंत्री, विधानपरिषद सभापती आणि विरोधी पक्षातील आमदार अशा सर्वांवरच आरोप होत आहेत. नेत्यांचे गुंडांबरोबरचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. गुंड ज्या पक्षांबरोबर असतात, तेव्हा ते पवित्र असतात आणि विरोधकांबरोबर असतात, तेव्हा ते समाज विघातक ठरतात, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. राज्यातील सर्वच पक्षांच्या जाणत्या नेत्यांनी याची दखल घेणे आवश्यक आहे. आपल्या पक्षात किंवा सरकारमध्ये असामाजिक तत्वांची मदत घेणाऱ्या नेत्यांना वेळीच चाप लावणे आवश्यक आहे. "जर वेळी चावर घातला नाही तर उत्तरेकडील काही राज्यांसारखी महाराष्ट्राची ही स्थिती होईल. आणि जशी बिहारमध्ये शेवटी सुशासनावर निवडणूक लढवावी लागली, ती वेळ महाराष्ट्रावरही येऊ शकते."
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement