Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 13 ऑगस्ट 2024

Continues below advertisement

भंडाऱ्यात चोरी करण्याच्या उद्देशानं गावात शिरलेल्या मध्यप्रदेशातील दोघांना नागरिकांनी चोपलं, दुचाकी आणि चोरीच्या साहित्यासह सिहोरा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल.

सोनं स्वस्तात विकण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबईतल्या खार पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांच्या घरी जाऊन कमी किंमतीत सोनं विकण्याचं आमिष दाखवायची. सर्वसामान्य नागरिकांचा आपल्यावर विश्वास बसण्यासाठी ते किरकोळ दागिनेही द्यायचे आणि समोरच्यांची खात्री पटल्यानंतर त्यांना नकली सोनं देऊन, त्या बदल्यात लाखो रुपये उकळून ही टोळी पळून जायची. मुंबईच्या खारमध्ये या टोळीने एका कुटुंबाला लाखो रुपयांना गंडा घातला. त्यानंतर या प्रकरणात खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या टोळीनं मुंबईत अनेक ठिकाणी नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे.

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram