साताऱ्यात Bharat Petroleumची पाईपलाईन अज्ञातांनी फोडली; पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
मुंबई-पुणे-सोलापूरदरम्यान असलेली भारत पेट्रोलियमची पाईपलाईन 8 दिवसांपूर्वी अज्ञातानं फोडल्याचं समोर आलं आहे. यातून 2 हजार लिटर पेट्रोल वाहून गेलं. साताऱ्यातील सासवड परिसरात हा प्रकार घडलाय. चोरट्यांनी पेट्रोल चोरल्यांनतर ते मोठ्या प्रमाणात जमिनीत पुरलं. त्याचा परिणाम परिसरातील शेती आणि विहिरींवर झाला आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.