Jalna Crime : जालनामध्ये उद्योजकावर टोळक्याचा हल्ला, बेदम मारहाण

Continues below advertisement
जालना शहरातील समाज नगर परिसरात उद्योजक यश Mittal यांच्यावर दुचाकीवर आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला. Mittal हे आपल्या पत्नीसोबत कारने जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांची कार अडवली आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 'दुचाकीला हुलकावणी दिल्याच्या रागातून मारहाण' झाल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. एका आरोपीने Mittal यांच्या डोक्यात रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक फेकून मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola