COWIN App Registration : लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनसाठी कोविन वेबसाईट क्रॅश
Continues below advertisement
देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया आज, 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे. मात्र नोंदणी करताना सुरुवातीला तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. या पोर्टलवर नोंदणी करताना सुरुवातीला मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर एक ओटीपी त्या मोबाईल नंबरवर पाठवला जातो, मात्र हा ओटीपी येत नसल्याचं समोर आलं आहे. तसेच अनेक यूजर्सनी साईट ओपन होत नसल्याच्या देखील तक्रारी केल्या आहेत.
Continues below advertisement