Cow Milk Rates Update : राज्यात गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर मिळणार

Continues below advertisement

राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी दुधाचा दर निश्चित करण्यासाठी दूध दर निश्चिती समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार दुधाला कमीत कमी ३४ रुपये दर द्यावाच लागणार आहे. त्यापेक्षा कमी दर देणाऱ्या दूध डेअऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. पण अनेकदा दुधाला चांगला दर मिळत नसल्यानं त्यांना मोठा फटका बसतो. पण आता दरनिश्चिती करण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram