Covishield | 'कोव्हिशिल्ड' नावाचा वाद व्यावसायिक न्यायालयात, सीरम विरोधात नांदेडच्या कंपनीकडून दावा

Continues below advertisement
कोरोनावर प्रभावशाली म्हणून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं लस बनवली. सीरमच्या कोव्हिशील्ड लशीला भारतात आपत्कालीन वापराला मंजुरी देखील मिळाली आहे. मात्र या लशीच्या CoviShield या नावावर नांदेड येथील क्‍युटीस बायोटीक या कंपनीने हरकत घेतली होती. त्या अनुषंगाने दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याला सीरमकडून न्यायालयाच्या कार्य क्षेत्रावर (territorial Jurisdiction) आक्षेप घेतला होता. हे प्रकरण फक्त व्यावसायिक न्यायालयात (commercial court) चालू शकते असा युक्तिवाद केला होता. अपेक्षेप्रमाणे क्‍युटीस बायोटेक हा वाद नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात घेऊन जाईल असा अंदाज बांधून सीरमने नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात कॅव्हेट टाकून ठेवली होती. परंतु क्‍युटीस बायोटेकने थेट पुण्याचे न्यायालय गाठले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram