Covishield आणि Covaxin लस 425 ते 450 रुपयांना मिळणार?
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस लवकरच मेडिकलमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी दरही निश्चित केले जाणार आहेत. मेडिकलमध्ये खुल्या बाजारात लस उपलब्ध झाल्यानंतर ही लस ४२५ ते ४५० रुपयांना उपलब्ध होऊ शकेल. लशीची मूळ किंमत २७५ रुपये आणि त्यावर दीडशे रुपये अतिरिक्त सेवा शुल्क असं मिळून ही लस ४२५ ते ४५० रुपयांना मिळेल असा अंदाज आहे.