Doctors Salary Issue | मराठवाड्यातील खऱ्या कोविड योद्ध्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही!
मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोरोना संकटाच्या काळात सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना मागील दोन महिन्यापासून शासनाने वेतनच दिले नसल्याने या डॉक्टरांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. वेतन न मिळालेल्या डॉक्टरांची संख्या ही 1200 पेक्षा जास्त आहे. ज्या मराठवाड्यातून महाराष्ट्राला आरोग्यमंत्री लाभले त्याच मराठवाड्यातील कोविड योद्ध्यांना उपासमारीची सामना करावा लागणे खेदजनक आहे.