Covid 19 vaccination | कोरोनाविरोधातील लढाईत आज महत्वपूर्ण दिवस; जालन्यातील लसीकरण केंद्राचा आढावा

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीला म्हणजेच सकाळी साडेदहा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात कोविड 19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असणार आहे. ज्याची व्याप्ती संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत असेल. याप्रसंगी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 3006 ठिकाणे आभासी पद्धतीने जोडली जाणार आहे. पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

तर राज्यात कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (शनिवार 16 जानेवारी) सकाळी 11.30 वाजता मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे. मुंबईत एकूण 9 केंद्रांवरील 40 बूथवर लसीकरण होणार आहे. सुरुवातीला दररोज सरासरी 4 हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram