Bavdhan Bagad Yatra| साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेनंतर कोरोना रुग्ण वाढले,गावातील 61जण पॉझिटिव्ह

सातारा : सातारा जिल्ह्यातील बावधनची बगाड यात्रा अंगलट आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यात्रा झाल्यापासून गावातील 61 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा ही महाराष्ट्रात सर्वात मोठी बगाड यात्रा समजली जाते. यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी 83 जणांवर अटकेची कारवाई देखील केली होती. 

राज्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना यात सातारा जिल्हा देखील मागे नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बावधनच्या बगाड यात्रेच्या आयोजनावर बंदी घातली होती. बावधनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी आणि यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलं होतं. परंतु प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत बावधनची बगाड यात्रा 2 एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली.

यात्रा झाल्यानंतर आता गावातील 61 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. शिवाय वाई तालुक्यातही कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola