Covid-19 Discharge Policy: केंद्र सरकारनं कोरोना रुग्णांच्या डिस्चार्ज पॉलिसीत बदल केलेत : ABP Majha
Continues below advertisement
देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशात आता केंद्र सरकारनं कोरोना रुग्णांच्या डिस्चार्ज पॉलिसीत (Discharge Policy) बदल केले आहेत. कोरोनाच्या हलक्या आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांना पॉझिटीव्ह आल्यानंतर कमीत कमी सात दिवस आणि सलग तीन दिवस ताप न आल्यास सुट्टी दिली जाणार आहे. या रुग्णांना डिस्चार्ज आधी कुठलीही टेस्ट करण्याची गरज नाही. हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत कोरोना (Coronavirus)संदर्भात काल झालेल्या बैठकीनंतर करण्यात आला आहे.
Continues below advertisement