Mumbai : Nawab Malik यांचे डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शन पुरावे : कोर्ट
मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते याचे सकृतदर्शनी पुरावे दिसतायत, असं निरीक्षण मुंबईतल्या विशेष न्यायालयानं नोंदवलंय. ईडीनं मलिक यांच्याविरोधात ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल विशेष न्यायालयानं घेतलीय. मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील मालमत्ता हडप करण्यासाठी मलिक यांनी थेट आणि जाणीवपूर्वक मनी लॉन्ड्रिंग केल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळं मलिकांच्या सुटकेचा मार्ग खडतर झालाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही मलिक यांनी मुनीरा प्लंबर यांची मालमत्ता हडपण्यासाठी दाऊदची बहीण हसीना पारकर तसंच सलीम पटेल आणि 1993 च्या बॉम्बस्फोटातला आरोपी सरदार शाहवली खान यांची मदत घेतल्याचं निरीक्षण कोर्टानं ईडीच्या आरोपपत्रावरून नोंदवलं. मलिक यांनी सरदार शाहवली खानबरोबर हसीना पारकर हिची अनेकदा भेट घेतल्याचंही ईडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. मलिक यांच्याविरोधात आरोपनिश्चिती झाल्यानंतर लवकरच खटल्याला सुरुवात होणार आहे.