Devendra Fadnavis : निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी कोर्टाकडून फडणवीस दोषमुक्त
२०१४च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी कोर्टानं आज फडणवीसांना दोषमुक्त केलं. सध्या जेलमध्ये असलेले अॅड. सतीश उके यांनी नागपूर कोर्टात ही याचिका केली होती. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नव्हता, असं कोर्टानं स्पष्ट केलं.