Cough Syrup Deaths | पुण्यात बनावट कफ सिरपविरोधात एफडीएची मोठी कारवाई
Continues below advertisement
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे एकोणीस मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे. एफडीएनं पुण्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. 'रेडीनेक्स फार्मास्युटिकल प्रायवेट लिमिटेड' या कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या 'रेस्पिफ्रेश टीआर' या औषधाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. औषध बनविणाऱ्या कंपन्या, मेडिकल आणि सरकारी दवाखान्यांमधून कफ सिरपचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी देखील केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारवाईमुळे औषधांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त होत आहे. एफडीएने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement