Cough Syrup Deaths | बालकांच्या मृत्यूने सरकार अलर्ट, पुण्यात औषधांचा मोठा साठा जप्त

Continues below advertisement
गेल्या काही काळापासून कप सिरप चर्चेत आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कप सिरपमुळे एकोणीस बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुण्यामध्ये मोठी कारवाई केली. रेडीनेक्स फार्मास्युटिकल प्रायवेट लिमिटेड या कंपनीद्वारे तयार करण्यात आलेला रिफ्रेश टिया या औषधाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औषध बनवणाऱ्या कंपन्या, मेडिकल स्टोअर्स आणि सरकारी दवाखान्यांमधून कप सिरपचे नमुने गोळा केले जात आहेत. या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. या कारवाईमुळे औषध कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपासणी अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola