Corruption Charges : 'Murlidhar Mohol यांनी 200 कोटींचा फायदा दिला' – Ravindra Dhangekar यांचा आरोप
Continues below advertisement
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि व्यावसायिक विशाल गोखले (Vishal Gokhale) यांच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धंगेकर यांनी आपल्या एक्स (X) पोस्टमध्ये 'मुरलीधर मोहोळ यांनी एका कंपनीला तब्बल दोनशे कोटी रुपयांचा फायदा करून दिला' असा थेट आरोप केला आहे. धंगेकरांच्या म्हणण्यानुसार, बॉम्बे फ्लाइंग क्लबकडून एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाला २०० कोटींची थकबाकी वसूल होणे अपेक्षित होते, मात्र केवळ २.३० कोटींमध्ये तडजोड करण्यात आली. यामुळे हवाई उड्डाण विभागाचे १९८ कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याच क्लबने विशाल गोखले यांना प्रायवेट जेट उपलब्ध करून दिल्याचा व्हिडिओही धंगेकरांनी पोस्ट केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणीही धंगेकरांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement