Coronavirus | थाटामाटात लग्नाचा हट्ट नडला, गुन्हा दाखल

कोरोना व्हायरससंदर्भात राज्य सरकार आणि प्रशासन आपल्या स्तरावरुन सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याला काही लोकं चांगला प्रतिसाद देत आहेत तर काहीजण या स्थितीत देखील नियम मोडत आहेत. बीडमध्ये जिल्हाधिकारी यांनी दिलेला यांचा जमावबंदी आदेश डावलत नातेवाईकांना जमवून लग्न लावणाऱ्या भटजी, आई वडील नातेवाईक, फोटोग्राफरसह आठ जणांना आज काही काळ पोलीस कोठडीची हवा खावी लागली. ही घटना बीड जिल्हयातील माजलगाव शहरात जवळील ब्रम्हगाव येथे घडली. गाजावाजा करून धूमधडाक्यात लग्न करण्याचा हट्ट या मंडळींना नडला असून कायदा मोडला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola