Pandharpur | विठ्ठल मंदिर भाविकांविना ओस, दर्शन रांगही मोकळी
कोरोनाचे संकट राज्यभर वाढू लागल्याने आता राज्यातील प्रसिद्ध मंदिरांकडेही भाविकांनी पाठ फिरवलीय. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरही आता भाविकांवीना ओस पडू लागलंय. राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचे नवनवे रुग्ण रोज वाढू लागल्याने भाविकांनाही कोरोनाची धास्ती बसलीय. ज्या विठ्ठल मंदिरात या कोरोना काळातही 25 ते 30 हजार भाविक दर्शनाला येत होते. तिथे गेल्या 8 दिवसांपासून अवघे 800 ते हजार भाविक आलेत.. मंदिराची दर्शन रांग दिवसभरात अनेकवेळा मोकळी पडल्याचं चित्र दिसतंय.