Corona Update | परभणीत कोरोना स्थिती गंभीर; 3 दिवसांत 984 रुग्णांची नोंद
परभणीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. परभणीमध्ये गेल्या 3 दिवसांत 984 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरातील कोरोना रुग्णालयांमध्येही जागा शिल्लक नाही. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असलं तरिही नागरिक मात्र बेफिकीरपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.